Home | Maharashtra | Kokan | Ratnagiri | ratnagiri salvi stop accident

दोन वाहनांच्या धडकेत पादचा-याचा मृत्यू

प्रतिनिधी | Update - Jun 14, 2012, 12:49 PM IST

अ‍ॅपे टेम्पोने ठोकरल्याने विरुद्ध दिशेने येणा-या स्कोडा गाडीला धडकून एक पादचारी व्यक्ती ठार झाली.

  • ratnagiri salvi stop accident

    रत्नागिरी - अ‍ॅपे टेम्पोने ठोकरल्याने विरुद्ध दिशेने येणा-या स्कोडा गाडीला धडकून एक पादचारी व्यक्ती ठार झाली. रत्नागिरी शहरातील साळवीस्टॉप येथे बुधवारी सकाळी ११.३० च्या सुमारास हा विचित्र अपघात घडला.
    अरुण धोंडिराम मिरजोळकर (५५) हे त्यांची बाईक रस्त्याच्या कडेला लावून पायी त्यांच्या मित्राकडे जात असतांना समोरुन आलेल्या अ‍ॅपे टेम्पोने त्यांना पहिल्यांदा धडक दिली. यामुळे मिरजोळकर कुवारबाच्या दिशेने जाणा-या स्कोडा गाडीली धडकले. या अपघातात त्यांच्या डोक्याला जबर मार लागला आणि ते रस्तावर रक्ताच्या थारोळ्यात पडले. या अपघातानंतर रस्त्यावरील लोक धाऊन आले आणि त्यांनी मिरजोळकरांना शासकीय रुग्णालयात दाखल केले मात्र तो पर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.
    बराच वेळ झाला तरी मिरजोळकर आले नाहीत म्हणून त्यांचे मित्र पांचाळ यांनी त्यांना मोबाईलवर फोन केला, तेव्हा त्यांना रुग्णालयात घेऊन येणा-या व्यक्तीने फोन उचलून त्यांच्या अपघाताची माहिती दिली. दरम्यानच्या काळात मिरजोळकरांना धडक देणारे दोन्ही वाहने घटनास्थळावरुन पसार झाली होती.Trending