Home | Maharashtra | Kokan | Ratnagiri | ratnagiri-zp-education-english-school

इंग्रजी शाळांकडून नियमांची पायमल्ली, तीन शाळांवर जिल्हा परिषद करणार कारवाई

प्रतिनिधी | Update - Dec 01, 2011, 02:59 PM IST

लांजा गावातील तीन इंग्रजी शाळांनी अंतराचे नियम डावलून थेट मराठी शाळांच्याजवळच शाळा सुरु केल्या आहेत. या शाळांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती शरद लिंगायत यांनी सांगितले.

  • ratnagiri-zp-education-english-school

    रत्नागिरी - लांजा गावातील तीन इंग्रजी शाळांनी अंतराचे नियम डावलून थेट मराठी शाळांच्याजवळच शाळा सुरु केल्या आहेत. या शाळांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती शरद लिंगायत यांनी सांगितले.
    लांजा येथील इंडो अकॅडमी, डी.जे.सा मंत, आणि ज्ञानेश्वर विद्यामंदीर या तीन इ ंग्रजी माध्यमांच्या शाळांनी परवानगी मागतांना अंतराचे निकष पूर्ण करण्यासाठी शाळेची जी जागा दाखविली तेथे शाळा सुरु न करता मराठी शाळेला लागूनच इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. या शाळा अनधिकृत असून, ही शासनाची फसवणूक असल्याचे जिल्हा परिषदेच्या शिक्षण सभापतींनी म्हटले आहे.
    शासनाचा नियम आहे की, इंग्रजी शाळा आणि मराठी शाळायांमधील अंतर हे तीन किलोमीटर असा यला हवे. मात्र या तीन शाळांनी नियमाला फाटा देऊन मराठी शाळांजवळच इंग्रजी शाळा थाटल्याचे शिक्षण विभा गाच्या तपासणीत उघड झाले आहे. त्यानंतर जिल्हापरिषदेने या शाळांवर कारवाईचे संकेत दिले आहेत.Trending