जमिनीच्या वादातून वृद्धाच्या / जमिनीच्या वादातून वृद्धाच्या डोक्यात कोयत्याने वार

प्रतिनिधी

Jun 25,2012 03:17:22 PM IST

संगमेश्वर - जमिनीच्या भांडणावरुन उपळे-वरचीवाडी येथील निशाणमोड येथे एका वृद्धाच्या डोक्यात कोयत्याने वार करण्यात आले तर, भांडण सोडवण्यास गेलेल्या वृद्धाच्या मुलीच्या डोक्यात दगड फेकून मारण्यात आला. या दोघांवर संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
उपळे-वरचीवाडी येथील पांडुरंग सोनू घडशी (६३) हे शनिवारी गुरे चरवून निशाणमोडी येथे लावलेल्या काजू कलमांची पाहाणी करत होते. त्यांना काही कलमा उपटून टाकल्याचे लक्षात आले. याबद्दलची विचारणा केली असता त्या ठिकाणी लपून बसलेले शांताराम गंगाराम जाधव याने त्यांच्या डोक्यात कोयत्याने वार केले. घडशी यांची मुलगी मीना घडशी (२४) भांडण सोडवण्यासाठी गेली असता तिच्या डोक्यावर दगड फेकून मारला.
या प्रकरणी संगमेश्वर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.X
COMMENT