देशातील पहिला सी / देशातील पहिला सी वर्ल्ड सिंधुदुर्गात

प्रतिनिधी

Oct 19,2011 06:44:37 AM IST

मुंबई: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रस्तावित सी वर्ल्ड (थीम पार्क) प्रकल्पाला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवारी मान्यता दिली. या प्रकल्पाचा अंदाजित खर्च सुमारे 510 कोटी रुपये असून तो खासगी सहभागातून उभारण्यात येणार आहे. प्रकल्पासाठी व्यवहार्यता तफावत निधीपोटी 100 कोटी रुपये शासन देणार आहे. या प्रकल्पाचे आज मंत्र्यांसमोर सादरीकरण करण्यात आले.
आंतरराष्ट्रीय दर्जाचे मत्स्यालय, परिषद केंद्र, पर्यटक निवास, डॉल्फिन स्टेडियम, थिएटर, जलक्रीडाकेंद्र, थीम रेस्टॉरंट, पाण्याखालील चित्रीकरण स्टुडिओंचा या प्रकल्पात समावेश आहे. हा प्रकल्प प्रत्यक्ष समुद्रात न उभारता किनाºयाजवळील पडिक जमिनीवर उभारला जाणार आहे.

X
COMMENT