आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकाने रायगड दुमदुमला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अलिबाग - हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा 340 वा राज्याभिषेक सोहळा गुरुवारी मंगलमय वातावरणात किल्ले रायगड येथे साजरा झाला. या सोहळ्यासाठी राज्यभरातून आलेल्या शिवप्रेमींनी गर्दी केली होती.
या वेळी शिवरायांचे वंशज युवराज छत्रपती संभाजी राजे, भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती. 6 जून 1674 रोजी रायगडावर शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक झाला होता. तेव्हापासून दरवर्षी हा सोहळा शिवप्रेमी उत्साहाने साजरा करतात. यंदाच्या सोहळ्यात महिलांनी विशेष गर्दी केली होती. सिंदेखडराजा, कोल्हापूर, सोलापूर आणि राज्यातील इतर शहरातील शिवप्रेमींसह संभाजी बिग्रेडच्या कार्यकर्त्यांची लक्षणीय उपस्थिती होती. काही कार्यकर्त्यांनी बुधवारी गडावर कार्यक्रम साजरे केले.