Home | Maharashtra | Kokan | Ratnagiri | shiv sena Leader and Ex MLA Parshuram Uparkar to Entry in MNS

शिवसेनेचे माजी आमदार परशुराम उपरकर मनसेच्या वाटेवर

दिव्य मराठी नेटवर्क | Update - Jan 07, 2013, 12:37 PM IST

सिंधुदुर्ग येथील शिवसेनेचे नेते आणि माजी आमदार परशुराम उपरकर मनसेच्या वाटेवर असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे.

  • shiv sena Leader and Ex MLA Parshuram Uparkar to Entry in MNS
    सिंधुदुर्ग- सिंधुदुर्ग येथील शिवसेनेचे नेते आणि माजी आमदार परशुराम उपरकर मनसेच्या वाटेवर असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे. उपरकरांना विधान परिषदेचे तिकीट न दिल्यामुळे ते नाराज झाले आहेत. त्यामुळे त्यांनी महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली असून सहका-यांसह मनसेमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

    विनायक राऊत, अरूण दुधवडकर आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वैभव नाईक, यांच्या कार्यपद्धतीवर उपरकर हे नाराज आहेत. त्यामुळे उपरकर मनसेमध्ये प्रवेशाची ता‍रीख अद्याप कळू शकली नाही. परंतु उपरकर आपल्या सहकार्‍यासह लवकरच मनसेत प्रवेश करतील, अशी माहिती माजी जिल्हाप्रमुख अरुण सावंत यांनी सावंतवाडी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

Trending