Home | Maharashtra | Kokan | Ratnagiri | Shivsena And Congress Rada in Kankavli Sindhudurga

शिवसेना-काँग्रेस राडा : कणकवलीत पोलिसांनी दिला शिवसैनिकांना बेदम चोप

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 25, 2013, 02:06 PM IST

कणकवली येथे काँग्रेस आणि शिवसेनच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला, त्याच्या निषेधार्थ शिवसेनेने आज (सोमवार) कणकवली बंदचे आवाहन केले आहे.

 • Shivsena And Congress Rada in Kankavli Sindhudurga
  सिंधुदुर्ग - कणकवली येथे काँग्रेस आणि शिवसेनच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला. दुस-या दिवशीही येथे तणावाची परिस्थीती असून नारायण राणे आणि शिवसेना नेत्यांमधील शाब्दीक चकमक संपायचे नाव घेत नाही आहे.
  रविवारी काँग्रेस आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये फ्री स्टाइल झाली. काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते नारायण राणे यांच्यावर केलेल्या आरोपांवरून दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत होत्या. नेत्यांनी एकमेकांना आमने-सामने येण्याचे आव्हान केले आणि रविवारी दोन्ही पक्षाचे नेते आमने-सामने आले. यामुळे परिस्थिती तणावपूर्ण झाली होती. पोलिसांनी दक्षताम्हणून शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांना ताब्यात घेतले यामुळे संतप्त शिवसैनिक पोलिसांच्या आंगावर धावून आले. शिवसेना नेत्यांनी पोलिस अधिक्षकांसोबत बाचाबाची केली. यानंतर पोलिसांनी शिवसैनिकांवर जोरदार लाठीचार्ज केला. यात शिवसेनेचे उप-जिल्हाप्रमुख राजू शेट्ये गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यासह अनेक शिवसैनिकांवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
  पोलिसांच्या लाठीचार्जमुळे आजही (सोमवार) परिस्थिती तणावपूर्ण आहे. रविवारी झालेल्या राड्यानंतरही राणे आणि शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत.
  पुढील स्लाइडमध्ये पाहा, कशा पद्धतीने दिला शिवसैनिकांना पोलिसांनी चोप..

Trending