रणधुमाळी: सिंधुदुर्ग जिल्ह्यात / रणधुमाळी: सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन तिघाडा, काम बिघाडा

दिव्य मराठी वेब टीम

Dec 06,2011 03:40:33 PM IST

सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्यात निवडणुकीची रणधुमाळी रंगात येत असताना वेंगुर्ले शहरात कॉंग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीत राडा झाला आहे. युवक कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष विलास गावडे यांच्या घराचा दरवाजा सोमवारी मध्यरात्री अज्ञात व्यक्तिने वाजविल्यानंतर कॉंग्रेसचे शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर उतरून त्यांनी 50 ते 60 गाड्यांची तोडफोड केली आहे. त्यामुळे वेंगुर्ले शहरात तणाव वाढला होता.
आमदार परशुराम उपरकर यांच्या अंगरक्षकाने केलेल्या गोळीबारात कणकवली माजी उपनगराध्यक्ष समीर नलावडे जखमी झाले होते. त्यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या घटनेचे माहिती घेण्यासाठी गेलेले एका वृत्तवाहिनीचे पत्रकार सुरेश कोलगेकर यांच्या हातातील कॅमेरा हिस्कावून त्याचे नुकसान केले. रस्त्यावर दिसेल त्याला जमावाकडून मारहाण केली जात होती. वेंगुर्ले येथे पोलिसांचा बंदोबस्त असून संचारबंदी लागू केली होती. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून कॉंग्रेसने मंगळवारी वेंगुर्ले बंदची हाक दिली आहे.
स्वाभिमानी संघटनेचे नितेश राणे यांच्या समर्थकांनी विलास गावडे यांच्या घराच्या दरवाज्यावर लाथा मारल्याचे बोलले जात होते. परंतु, या प्रकाराला स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी नकार दिली होता. त्यानंतर निलेश राणे हे वेंगुर्ले येथे आल्याने राडा सुरु झाला होता.

X
COMMENT