यापुढे कोकणात कॉग्रेससोबत / यापुढे कोकणात कॉग्रेससोबत आघाडी नाही: बाळा भिसे

दिव मराठी नेटवर्क

Nov 09,2011 06:51:16 PM IST

सिंधुदुर्ग: कोकणात आघाडी सरकारच्‍या दोन मंत्र्यांमधील वाद आता विकोपाला गेला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते आणि मंत्री भास्कर जाधव यांच्‍या समर्थकांनी मालवण येथे उद्योगमंत्री नारायण राणे यांच्यात जोरदार जुंपली असून त्याचा कोकणातील आघाडीवर परिणाम होताना दिसत आहे.
यापुढे कॉग्रेससोबत आघाडी होणार नाही. कॉंग्रेसला जशास तसे उत्तर देण्यारत येईल, असे राष्ट्रवादीचे ‍सिंधुदूर्ग जिल्हाध्यक्ष बाळा भिसे यांनी बुधवारी सांग‍ितले. पोलिस यंत्रणा राणेंच्या दबावाखाली काम करते. यापुढे असा प्रकार खपवून घेतले जाणार नाही, असा आरोपही भिसे यांनी केला आहे.
सावंतवाडीच्या माजी नगराध्यतक्षा अलारोजीन लोबो यांनी सांगितले की, पोलिसांच्या समक्ष राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर हल्ले होत आहे.यापुढे असे घडले तर पोलिसांवर जबाबदारी राहतील.
भास्‍कर जाधव यांच्‍या कार्यालयाची सोमवारी तोडफोड करण्‍यात आली होती. त्‍याच्‍या निषेधार्थ "राष्ट्रवादी'च्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी राणेंचा पुतळा जाळला होता. त्यामुळे चिडलेल्या राणे समर्थकांनी "राष्ट्रवादी'चे तालुका अध्यक्ष सुधीर मांजरेकर यांच्या घरावर जोरदार दगडफेक केली होती. त्यामुळे मंगळवारी दिवसभर चिपळूणमध्ये तणावाचे वातावरण पसरले होते. मांजरेकर यांच्या घरावर दगडफेक करणाऱ्या काही राणे समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्‍याची माहिती आहे.

X
COMMENT