Home | Maharashtra | Kokan | Ratnagiri | Sindhudurga Nagar Palika Election Rane win

कणकवलीत राणेंचेच वर्चस्व; देवरूखमध्ये भगवा

प्रतिनिधी | Update - Apr 02, 2013, 08:36 AM IST

कणकवली नगर पंचायत निवडणुकीत राणेंच्या नेतृत्वाखालील कॉँग्रेस पक्षाने 13 जागा मिळवून स्पष्ट बहुमत मिळविले.

 • Sindhudurga Nagar Palika Election Rane win

  सिंधुदुर्ग - उद्योगमंत्री नारायण राणे यांचा बालेकिल्ला असलेल्या कणकवली नगर पंचायत निवडणुकीत राणेंच्या नेतृत्वाखालील कॉँग्रेस पक्षाने 13 जागा मिळवून स्पष्ट बहुमत मिळविले, तर त्यांच्याविरोधात एकत्र आलेल्या राष्ट्रवादी, शिवसेना व भाजपला मात्र अपयश आले आहे. 1७ जागांच्या पालिकेत काँग्रेसला 13, तर शिवसेनेला तीन, तर भाजपला एक जागा मिळाली. या निवडणुकीत मनसेनेही आपले तीन उमेदवार उभे केले होते. मात्र, त्यांच्यासह राष्ट्रवादीला खातेही उघडता आले नाही.

  पुढील स्लाइडमध्ये वाचा, गुहागरमध्ये ‘घड्याळा’चा गजर

  देवरूखमध्ये भगवा; राणेंना धक्का

 • Sindhudurga Nagar Palika Election Rane win

  गुहागरमध्ये ‘घड्याळा’चा गजर
  रत्नागिरी - जिल्ह्यातील गुहागरमधील पहिल्याच नगर पंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी कॉँग्रेसने 17 पैकी 11 जागा मिळवत स्पष्ट बहुमत प्राप्त केले. या निवडणुकीत  नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. भाजपला केवळ 6 जागांवर समाधान मानावे लागले. तर शिवसेना व कॉँग्रेसला तर एकही जागा निवडून आणता आली नाही.

 • Sindhudurga Nagar Palika Election Rane win

  देवरूखमध्ये भगवा; राणेंना धक्का
  देवरूख - शिवसेनेने स्पष्ट बहुमत मिळवत देवरूखमधील पहिल्याच नगर पंचायत निवडणुकीत सत्ता काबीज केली आहे, तर मनसेनेही खाते उघडले आहे. शिवसेनेने 12 जागा मिळवत स्पष्ट बहुमत मिळविले, राष्ट्रवादी कॉँग्रेसला चार जागांवर समाधान मानावे लागले. या निवडणुकीत कॉँग्रेसला एकही जागा मिळाली नाही, हा उद्योगमंत्री नारायण राणे यांचे पुत्र खासदार नीलेश यांना मोठा धक्का मानला जातो. नीलेश यांनी देवरूखची नगर पंचायत ताब्यात घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले होते.

Trending