Home | Maharashtra | Kokan | Ratnagiri | sindhudurga rainfall

संततधार पावसाने दरड कोसळण्याचे सत्र सुरुच

प्रतिनिधी | Update - Jul 21, 2012, 03:38 PM IST

संततधार पावसामुळे कोकण रेल्वे मार्गावर दरडी कोसळ्याचे सत्र सुरुच आहे.

  • sindhudurga rainfall

    सिंधुदूर्ग - संततधार पावसामुळे कोकण रेल्वे मार्गावर दरडी कोसळ्याचे सत्र सुरुच आहे. दरड कोसळल्याने रस्ते आणि रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. रेल्वेमार्गावर गेल्या दोन दिवसात आडवली- विलवडे स्थानकादरम्यान आणि राजापूरजवळ दोन ठिकाणी दरड कोसळली. यामुळे दोन वेळा रेल्वे मार्ग ठप्प झाला.
    संततधार पावसामुळे दरवर्षी कोकणरेल्वेला अनेक संकटांना सामोरे जावे लागते. पावसामुळे दरड कोसळतात आणि रेल्वे वाहतूक ठप्प होते. आडवली-विलवडे स्थानकादरम्यान कोसळलेली दरड बाजूला करण्याचे काम सुरु झाले झाले आणि रात्री तीनच्या सुमारास रेल्वेमार्ग वाहतूकीसाठी खुला करण्यात आला.
    विदर्भ एक्सप्रेस लोकल अपघातामुळे मंगला एक्सप्रेसच्या मार्गात बदल करण्यात आला होता. ही गाडी मनमाड-पनवेलमार्गे सोडण्यात आली. त्यामुळे १० तास उशिरा होती.Trending