खोपोलीत स्काय वॉकची / खोपोलीत स्काय वॉकची गरज

दिव्य मराठी

Dec 02,2011 02:42:06 PM IST

खोपोली - खोपोली शहर गर्दीचे शहर बनत चालले आहे.शहराच्या अरुंद रत्यावरून चालणाऱ्या पादचार्याला चालणे अवघड झाले आहे. मुंबई-पुण्याच्या धर्तीवर पादचाऱ्या साठी शहरात स्काय-वाक उभे करण्याची मागणी नागरिकान कडून होत आहे.
मुंबई-पुणेच्या मध्यवर्ती ठिकाणी खोपोली शहर वसले आहे. गगन गिरी महाराज यांच्या मठाला भेट देणाऱ्या भक्तांची तर पर्यटकांची संख्या दिवसागणी वाढत आहे. रेल्वे असल्याने थेट मुंबईतील व्यापारी व्यापारासाठी खोपोलीला येत आहेत . वाशी ते खोपोली अशी परिवहन सेवा सुरु असल्याने त्या ठिकाणचा वर्ग या न त्या करणाने खोपोलीत येत आहे.शहरात पूर्वापार कारखानदारी असल्याने त्यातील कामगार खोपोलीकर नागरिक झाला आहे. शहराच्या सर्वच भागात निवासी संकुले बनत असल्याने बाहेरील अनेक कुटुंबे शहरवासीय बनणार आहेत. १९७० ला नगरपालिका अस्तित्वात आल्यानंतर शहर अनेक अंगाने वाढत चालले आहे. त्यातच खोपोलीत शैक्षणिक संस्था असल्याने तालुक्यातून तर अन्य ठिकाणाहून विध्यार्थी शहरात येत आहेत. ग्रामीण भागातील आदिवासी भाज्या विक्रीसाठी शहरात येत असतात त्यातच आंबेडकर पुतळा शेजारी हातगाडीवाले भर रस्त्यात गर्दी करीत असल्या कारणाने अरुंद रत्यावरून दुचाकी, चारचाकी, रिक्षा चालवणे अवघड झाले आहे.शहरात हजारो रिक्षा सारख्या रत्यावरून धावत असतात त्यामुळे पादचार्यांना रत्यावरून चालणे जीकीरीचे बनत चालले आहे.
शहरातील अरुंद रस्ते आणि रत्यावर वाहनांची वाढलेली संख्या त्यातच रत्यावर अनेक कारणांनी सत्यात्त्याने होणारी गर्दी यामुळे खोपोली शहर गर्दीचे शहर बनत चालले आहे.रेल्वे आल्या नंतर रेल्वेस्थानक ते एसटी स्थानकात भर बाजार पेठेत गर्दीच गर्दी असते.सुंदर शहर बनवण्यासाठी शासनाच्या नगर विकासच्या माध्यमातून तर एम.एम.आर.दि.ए यांच्या माध्यमातून शहराच्या विकासासाठी निधी उपलब्ध होऊन मुंबई-पुणेच्या धरतीवर खोपोलीत आवश्यक त्या ठिकाणी पदाचार्ण्याच्या सोई साठी होणारी रस्त्यावरची गर्दी टाळण्यासाठी स्काय-वाक होणे गरजेचे असल्याची भावना शहरवासीयांनी बोलून दाखवली आहे.X
COMMENT