आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रवास महागला: कोकणालाही एसटी भाडेवाढीची झळ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रत्नागिरी- डिझेल आणि ऑईलचे दर वाढल्यामुळे एसटी महामंडळानेही बस भाड्यात 6.35 टक्के वाढ झाली होती. या भाडेवाढीची झळ कोकणालाही बसत आहे. महागाईने हैराण झालेली जनता यामुळे आणखी त्रस्त झाली आहे.
ग्रामीण भागामधील प्रवासाच्या तिकीट दरामध्ये एक रुपयापासून तीन रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. तर लांबपल्ल्याच्या तिकीट दरामध्ये 10 ते 20 रुपयांनी वाढ झाली आहे.
नवीन भाडेवाढीनुसार रत्नागिरी एसटी स्थानकातून सुटणा-या गाड्यांमध्ये गणपतीपुळ्‍याला जाण्यासाठी 2 ते 3 रुपये वाढ झाली आहे. जयगडपर्यंत जाण्यासाठी 3 रुपयांची वाढ झाली आहे. रत्नागिरी ते चिपळूणपर्यंत 5 रुपयांनी भाडेवाढ झाली आहे. मुंबई, पुणे, सोलापूर येथील प्रवास 20 ते 40 रुपयांनी महागला आहे. कोल्हापूर, मिरज, सावंतवाडीच्या तिकीट दरामध्येही 10 रुपयांनी वाढ झाली आहे. रत्नागिरीमधून दापोली, मंडणगड, गुहागर येथे जाताना प्रवाशांना 8 ते 10 रुपये जास्तीचे मोजावे लागणार आहेत.