तारामुंबरी खाडीमध्ये अचानक / तारामुंबरी खाडीमध्ये अचानक आलेल्या लाटेने होडीला जलसमाधी, मच्छिमार बचावले

प्रतिनिधी

Oct 19,2011 02:00:26 PM IST

सिंधुदुर्ग - तारामुंबरी खाडीमधून समुद्रात मच्छीमारीसाठी होडीने जात असताना मुखातील खडकाचा अंदाज न आल्याने होडीला जलसमाधी मिळाली. समुद्रात आलेल्या अचानक लाटांमळे मच्छीमारांनी पुढेचे काही दिसले नाही आणि त्यांची होडी खडकावर आदळली. अजस्त्र लाटांचा मारा आणि खडकाला धडकल्यामुळे होडीला जलसमाधी मिळाली.
या घटनेत होडीतील चारही जण बचावले होडीला जलसमाधी मिळाल्याने मच्छिमारांचे ५ लाख रुपयांचे नुकसान झाले. ही होडी मित्मुंबरी मधुकर बांदकर यांच्या मालकीची होती. मंगळवारी रात्री बांदकर हे आप्पा बांदकर, विनायक बांदकर या त्यांच्या मुलांसह तसेच अल्पेश नेसावंकर यांच्या बरोबर होडीने मच्छीमारीसाठी जात असतांना ही दुर्घटना घडली. या होडीची किंमत २ लाख रुपये, १ लाख ५० हजार रुपयाची जाळी
तर होडीमधील अन्य १ लाख ५० हजार रुपयांच्या सामनाचे नुकसान झाले आहे. या बाबत बंदर खात्याने पंचनामा केला असून, बांदकर कुटूंबावर मात्र आर्थिक संकटाची कु-हाड कोसळली आहे.


X
COMMENT