आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केंद्रीय भरती प्रक्रियेतून शिक्षकांच्या जागा भरणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रत्नागिरी - अनुदानित आणि विनाअनु‍दानित शाळांमध्‍ये आता केंद्रीय भरती प्रक्रियेतून शिक्षकांच्या जागा भरल्या जाणार आहेत. तसेच शिक्षकांची नवी पदे निर्माण करण्‍यात येणार असल्याचा उल्‍लेख शासकीय मसुद्यात आहे.2009 च्या शिक्षण हक्क कायद्यानुसार शासनावर मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण पुरवण्‍याची जबाबदारी आहे. त्यानुसार सरकार आता स्थानिका स्वराज्य संस्थांच्या शाळा आण‍ि विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांच्या जागा केंद्रीय प्रवेश परीक्षेद्वारे ( सीईटी) भरणार
आहे. या निर्णयाचा जास्त फटका संस्थाचालकांना बसणार आहे. इंग्रजी माध्‍यमातून डी.टी.एड आणि बी.एड करणा-या उमेदवाराला दुस-या माध्‍यमाच्या शाळेत इंग्रजी भाषा शिकवण्‍यासाठी नियुक्त केले जाणार आहे. मराठी माध्‍यमातून शिकलेल्या उमेदवारांना मराठीऐवजी दुस-या माध्‍यमांच्या शाळेत नियुक्त केले जाणार आहे.