Home | Maharashtra | Kokan | Ratnagiri | The Burning Bus Chiplun

बर्निंग बस : चिपळूण-कराड मार्गावर चालती बस पेटली

दिव्य मराठी वेब टीम | Update - Oct 17, 2013, 05:03 PM IST

चिपळूण-कराड मार्गावर पेडांबे गावाजवळ चालत्या बसने पेट घेतल्यामुळे कित्येक तास दोन्ही बाजूंची वाहतूक खोळंबली होती

  • The Burning Bus  Chiplun
    चिपळूण - चिपळूण-कराड मार्गावर पेडांबे गावाजवळ चालत्या बसने पेट घेतल्यामुळे कित्येक तास दोन्ही बाजूंची वाहतूक खोळंबली होती. या घटनेत कोणतीही जिवीतहानी झालेली नाही, मात्र बसचे मोठे नुकसान झाले आहे.
    पेडांबे गावाजवळ चालत्या मिनीबसने पेट घेतल्याचे मागून येणा-या वाहनातील लोकांनी बसचालकाला सांगितले. तोपर्यंत बसमधील प्रवाशांनाही या आगीची कल्पना नव्हती. त्यानंतर तत्काळ बस रिकामी करण्यात आली. पुढच्या काही क्षणांतच बसने आणखी पेट घेतला. जवळपास तीन तास आग विझवण्याचे काम सुरू होते.
    या दुर्घटनेमुळे चिपळूण - कराड मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. बस पेटल्याची वेळीच माहिती मिळाल्याने कोणतीही जिवीत हानी झाली नाही. मात्र अनेक प्रवाशांचे सामान बससोबत जळाले आहे.

Trending