Home | Maharashtra | Kokan | Ratnagiri | three dead in nivali dam

धबधब्यात बुडून तिघांचा अंत

प्रतिनिधी | Update - Jul 30, 2012, 11:28 AM IST

रविवारची सुटी एन्जॉय करण्यासाठी रत्नागिरी शहरातील महाजनी असोशिएटचे वकील प्रसाद महाजनी त्यांच्या सहकाऱ्यांबरोबर निवळी धबधब्याजवळ गेले होते

  • three dead in nivali dam

    रत्नागिरी: पिकनिकला गेलेले तिघे जण निवळी येथे धबधब्यात वाहून गेले. रविवारची सुटी एन्जॉय करण्यासाठी रत्नागिरी शहरातील महाजनी असोशिएटचे वकील प्रसाद महाजनी त्यांच्या सहकाऱ्यांबरोबर निवळी धबधब्याजवळ गेले होते. त्यावेळी ही दुर्देवी घटना घडली.

    या अपघातामध्ये एक महिला वकिल देखील वाहून गेली आहे. महिलेला वाचवण्यासाठी महाजनी पाण्यात गेले होते. पण, अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने तिला वाचवण्याच्या प्रयत्नात प्रसाद महाजनी आणि त्यांचे सहकारी हे देखील वाहून गेले.
    अँड. अपर्णा कुलकर्णी, अनुजा शेठ आणि प्रसाद महाजनी अशी मृतांची नावं आहेत. दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

Trending