मुलीचा मृतदेह घेऊन / मुलीचा मृतदेह घेऊन परतणार्‍या आई-वडिलांचाही अपघाती मृत्यू

May 09,2014 07:39:00 AM IST
रत्नागिरी - अपघातात मरण पावलेल्या 17 वर्षीय मुलीचा मृतदेह घेऊन गावी परत येताना कारवर जेसीबी आदळून आई-वडिलांचाही मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना गुरुवारी हातखंबा (ता. खेड) येथे घडली. या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांसह चार जणांचा मृत्यू झाला.
प्रवीण कदम हे आपली मुलगी धनश्री व पत्नी प्रियंका यांच्यासह स्वत:च्या रिक्षातून खेडकडे चालले होते. मात्र, संगमेश्वरजवळ त्यांच्या रिक्षाला समोरुन येणार्‍या चारचाकीने धडक दिली. यात धनश्रीचा मृत्यू झाला. शवविच्छेदन झाल्यानंतर मुलीचा मृतदेह रुग्णवाहिकेतून व कदम दांपत्य एका कारमधून खेडकडे येत होते. या दु:खी दांपत्यावर काळाने पुन्हा घाला घातला. हातखंबा येथे त्यांच्या कारवर ट्रेलरवर ठेवलेले जेसीबी कोसळल्याने कारचे अक्षरश: दोन तुकडे झाले. या अपघातात कदम दांपत्यासह कारचालकाचा मृत्यू झाला.
X