Home | Maharashtra | Kokan | Ratnagiri | three person death at sindhudurg district for fever

कणकवलीत अज्ञात तापाचे थैमान, तिघांचा मृत्यू

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jul 25, 2012, 12:16 PM IST

कणकवली तालुक्यात अज्ञात तापाने गेल्या दोन ‍दिवसात तिघांचा मृत्यू झाला आहे.

  • three person death at sindhudurg district for fever

    सिंधुदूर्ग- कणकवली तालुक्यात अज्ञात तापाने गेल्या दोन ‍दिवसात तिघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा हादरली असून सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना अतिदक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
    कणकवली तालुक्यातील तोंडवली, देवगड आणि कुंभवडे या तीन गावात ही अज्ञात तापाची साथ पसरल्याचे बोलले जात आहे. या तापाची लागण 23 रूग्णांना झाली असून त्यांच्यावर उप जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
    गेल्या वर्षी पावसाळ्यात जिल्ह्यात लेप्टोची साथ पसरली होती. त्यात 29 जणांचा बळी गेला होता. यंदा अज्ञात तापाची साथ पसरली असून अद्याप त्याचे निदान झालेले नाही. हा ताप लेप्टोसदृष असल्याचा अंदाज प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकार्‍यांनी वर्तवला आहे.

Trending