आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मालवणच्या समुद्रकिनार्‍यावर सापडली विष्णूरुपी तिरुपती बालाजीची मूर्ती

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रत्नागिरी- मालवणच्या समुद्रकिनार्‍यावर विष्णूरुपी तिरुपती बालाजीची पूरातन मूर्ती आढळून आली आहे. सकाळी फेरफटका मारण्यासाठी गेलेल्या दोन चिमुरड्यांना ही सहा इंच लांबीची ‍बालाजीची मूर्ती दिसली. मूर्ती वाळूत रुतलेली होती. चिमुरड्यांनी ती अलगद बाहेर काढली. मूर्ती काळ्या पाषाणाची असून रेखीव आहे. गेल्या महिन्यात याच किनार्‍यावर ब्रह्मदेवाची तर मेढा राजकोय भागात शिवकालीन तोफ आढळून आली होती.

मालवण शहराला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. त्यामुळे समुद्र किनार्‍यावर अशा प्रकारच्या प्राचिन मूर्ती आढळत असल्याचे जानकारांचे मत आहे.