Home | Maharashtra | Kokan | Ratnagiri | Tried To Tourch PSI By Pouring Petrol, Suspects Arrested

रत्‍नागिरीत पेट्रोल टाकून जाळलेल्‍या फौजदाराचा अखेर मृत्‍यू

वृत्तसंस्था | Update - Oct 07, 2013, 09:26 AM IST

सहायक पोलिस उपनिरीक्षक हरिश्चंद्र पेवेकर (56) यांच्यावर रविवारी पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला होता.

  • Tried To Tourch PSI By Pouring Petrol, Suspects Arrested

    रत्नागिरी - पेट्रोल टाकून जाळण्‍यात आलेले रत्‍नागिरीतील सहायक पोलिस उपनिरिक्षक हरिश्चंद्र पेवेकर (56) यांचा अखेर मृत्‍यू झाला. अज्ञात चार ते पाच जणांनी त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला होता. ही घटना रविवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास शहरात घडली होती. पेवेकर यांनी नावे सांगितलेल्या दोन संशयित हल्लेखोरांना पोलिसांनी अटक केली आहे. पेवेकर 80 टक्के भाजल्या गेले होते. गंभीर अवस्‍थेत त्‍यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्‍यात आले होते. परंतु, त्‍यांनी काल रात्री उशीरा प्राण सोडले.

    कुवारबाव येथील सामाजिक न्याय भवन येथे दोन व्यक्तींसोबत पेवेकर यांची भेट ठरली होती. पेवेकर येताच दोघांनी हल्ला चढवला. सोबत आणलेले पेट्रोल त्यांच्या अंगावर ओतून त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न करून ते फरार झाले. नागरिकांनी त्यांना रुग्णालयात हलवले. परिसरातील लोकांनी पेवेकर यांना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केले. ल्लेखोर पाच ते सहा जण असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना सांगितले. हल्ल्यामागील कारणांचा उलगडला झाला नसला तरी, हे प्रकरण संपत्तीच्या वादातून घडले असण्याचे पोलिस म्हणाले.

Trending