आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन गटांत हाणामारी; सात अटकेत, आठ फरार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रत्नागिरी- भा‍टीमिर्‍या येथील दोन कुटुंबांनी परस्परविरोधी तक्रार केली आहे. किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे पर्यावसान हाणामारी झाले. यात दोन गटांतील लोकांनी एकमेकांवर बेदम मारहाण केली. या प्रकरणी दोन्ही गटांतील सात संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे तर आठ जण अद्याप फरार आहेत.
सात आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. ही घटना शनिवारी रात्री घडली.
नंदकुमार कुशा वांदरकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार यांचे अंकिता वांदरकर यांच्या कुटुंबाशी अनेक दिवसांपासून जमिनीवरुन वाद होता. नंदकुमार याने काही दिवसांपूर्वी बांधकामासाठी खडी व वाळू आणून ठेवली होती. त्यावर अंकिता वांदरकर व त्यांच्या कुटुंबाचे मुद्दाम सांडपाणी टाकले म्हणून आपला भाऊ उद्य व भावजय विद्या त्यांना याबाबत विचारणा करण्यास गेली. त्याचा राग मनात धरून अंकिता वांदरकरसह अजय वांदरकर, रसिका वांदरकर, तन्वी वांदरकर, भिकाजी वांदरकर, वैभव भाटकर, रणजित भाटकर प्रियांका भाटकर यांनी एकत्र येऊन आपल्या कुटुंबियांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. पोलिस पुढील तपास करीत आहे.