Home | Maharashtra | Kokan | Ratnagiri | Uddhav Thackeray in Sindhudurga Kankavli

आमच्यावर उगारलेले हात कलम केल्याशिवाय राहाणार नाही, नाव न घेता उद्धव यांचा 'प्रहार'

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 26, 2013, 08:42 PM IST

आमच्यावर उगारलेला हात खांद्यापासून वेगळा केल्या शिवाय राहाणार नाही. यापुढे पोलिस आणि सत्ताधा-यांची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.

 • Uddhav Thackeray in Sindhudurga Kankavli
  सिंधुदुर्ग / कणकवली - आमच्यावर उगारलेला हात खांद्यापासून वेगळा केल्या शिवाय राहाणार नाही. यापुढे पोलिस आणि सत्ताधा-यांची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.
  कणकवलीत रविवारी शिवसैनिक आणि पोलिसांमध्ये झालेल्या धुमश्चक्रीत उप जिल्हाप्रमुख राजू शेट्ये आणि अनेक शिवसैनिक जखमी झाले होते. त्यांची भेट घेण्यासाठी उद्धव ठाकरे आज (मंगळवार) कणकवलीत आले आहेत. त्यांनी जिल्हा प्रमुख वैभव नाईक व शेट्ये यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी शिवसैनिकांना संबोधित करताना कोणाचेही नाव न घेता, कोकणात विकास केवळ एका कुटुंबांचा झाला असल्याची टीका नारायण राणे यांच्यावर केली.
  (नारायण राणे यांनी दिले प्रत्युत्तर, वाचा येथे क्लिक करुन काय म्हणाले राणे)
  राज्याचे गृहमंत्री आर.आर.पाटील हे कवळ तोंडाचा डबा वाजवतात अशी टीका करतानाच शिवसैनिकांना बेदम मारहाण करणा-या पोलिस अधिक्षक अभिषेक त्रिमुखेंची तत्काळ बदली करण्याची धमक त्यांनी दाखवावी, असेही उद्धव म्हणाले.

  पत्रकार परिषदेत उद्धव यांनी मुख्यमंत्री लकवा झालेले तर शरद पवार चकवा देणारे असल्याची टीक केली. या दोन्ही नेत्यांकडून कोणतीही अपेक्षा नसल्याचे ते म्हणाले.

  पुढील स्लाइडमध्ये, पत्रकारांनीही अन्यायाला वाचा फोडली पाहिजे

 • Uddhav Thackeray in Sindhudurga Kankavli
  उद्धव ठाकरे म्हणाले, हा लढा कोकणाच्या विकासासाठीचा आहे. रविवारी शिवसैनिकांना बेदम मारहाण करण्यात आली. त्यांना भेटण्यासाठी मी गोव्याला गेलो होतो. जर, कोकणात रुग्णांवर उपचार होणार नसतील तर विकास कोणाचा झाला, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.  नारायण राणे यांचे नाव न घेता केवळ एका कुटुंबाचा येथे विकास झाला आहे. कोकणाच्या सर्वांगिण विकासासाठी कोकणी माता-भगिणींनी या लढ्यात सहभागी झाले पाहिजे. विकास काय असतो हे शिवसेना दाखवून देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 
   
  पोलिसांच्या मारहाणीचा समाचार घेताना ते म्हणाले, कोकण ही देवभूमी आहे. येथे भगवाच फडकणार. दुसरं कोणतंही फडकं येथे फडकू देणार नाही. यापुढे शिवसेना आणि शिवसैनिकांकडे कोणी वाकड्या नजरेने पाहाण्याचीही हिंमत करणार नाही अशी ताकद कोकणातील शिवसैनिकांनी निर्माण केली पाहिजे, असे आवाहन उद्धव यांनी केले. पोलिस जर विनाकारण मारहाण करत असतील तर यापुढे शिवसैनिक गप्प बसणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. 

  पुढील स्लाइडमध्ये, काय आहे प्रकरण 
 • Uddhav Thackeray in Sindhudurga Kankavli
  पत्रकारांनीही अन्यायाला वाचा फोडली पाहिजे
   
  रविवारी पत्रकारांनाही मारहाण झाली, याचा उल्लेख करुन ते म्हणाले 
  अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना पत्रकारांना मारहाण झाली तेव्हा एक समिती नेमली गेली आहे. नाराणय राणे यांचे नाव न घेता, या समितीचे अध्यक्ष कोण आहेत ते तुम्हाला माहिती आहे. त्यांच्याकडून तुम्हाला न्याय मिळेल का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. 

  पुढील स्लाइडमध्ये, राणेंचा पत्रकारांवर रोष 
 • Uddhav Thackeray in Sindhudurga Kankavli
  काय आहे प्रकरण :

  नारायण राणे यांच्यावर शिवसेनेकडून केले जाणारे आरोप खोडून काढण्यासाठी राणे व त्यांच्या सर्मथक अणि शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांची रविवारी कणकवलीतील मराठा सभागृहात खुली चर्चा होणार होती. मात्र, त्याआधीच शिवसैनिकांना अटकाव करण्यात आल्याने पोलिस व शिवसैनिकांमध्ये संघर्ष पेटला. यात शिवसैनिकांसह पोलिसही जखमी झाले. सोमवारी शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांच्यासह शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकार्‍यांना अटक करण्यात आली. त्यामुळे शिवसेनेत प्रचंड राग धुमसत आहे. 
 • Uddhav Thackeray in Sindhudurga Kankavli
  राणेंचा पत्रकारांवर रोष 
  घटनेनंतर सोमवारी राणे यांचा पारा चढला. त्यांनी विनायक राऊत यांचा कोकणाशी काय संबंध आहे, असा सवाल केला. ते म्हणाले, पोलिसांवर हात टाकण्याची शिक्षा शिवसैनिकांना भोगावी लागली. मात्र, यात पत्रकारांचाही तितकाच दोष आहे. शिवसेनेने आपल्यावर आरोप केले की, रत्नागिरीतील पत्रकार त्याला मोठी प्रसिद्धी देतात. राणेंच्या विरोधात बातम्या दिल्या की प्रसिद्धी मिळते. मात्र यामुळे शांतता बिघडते, याकडे ते दुर्लक्ष करतात. 

Trending