Home | Maharashtra | Kokan | Ratnagiri | udhav Thackeray at Chiplun Sahitya Samelan

'शिवसेनाप्रमुखांनी मराठी माणसाला कुंचल्याने वाघ बनवले'

विषेश प्रतिनिधी | Update - Jan 13, 2013, 12:39 PM IST

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची ताकद त्यांच्या कुंचल्यामध्ये होती. याच कुंचल्याच्या फटकार्‍यांनी त्यांनी मराठी माणसांमध्ये वाघाची ताकद निर्माण केली.

  • udhav Thackeray at Chiplun Sahitya Samelan

    यशवंतराव चव्हाण नगरी- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची ताकद त्यांच्या कुंचल्यामध्ये होती. याच कुंचल्याच्या फटकार्‍यांनी त्यांनी मराठी माणसांमध्ये वाघाची ताकद निर्माण केली. केवळ कुंचल्याच्या साहाय्याने एवढे मोठे कर्तृत्व अन्य कोणी गाजवले असेल याचे अन्य उदाहरण माझ्या तरी बघण्यात नाही. शिवसेनाप्रमुखांचे नाव चिपळूणमधील साहित्य संमेलनाच्या मुख्य व्यासपीठाला दिल्यानंतर त्यावरून वाद निर्माण होतील, असे कधीही वाटले नव्हते, असे प्रतिपादन शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आज केले.

    आजवर चित्रकार व व्यंगचित्रकार यांचे मनोगत जाणून घेण्याचा प्रयत्न कधीही झालेला नव्हता. तो प्रयोग प्रथमच चिपळूणच्या साहित्य संमेलनात ‘आमच्या रेषा, बोलतात भाषा’ या परिसंवादाच्या माध्यमातून आज झाला. यात परिसंवादात सहभागी झालेल्या नामवंत व्यंगचित्रकार, चित्रकारांचा आज उद्धव ठाकरे यांच्या हस्ते संमेलनस्थळी सत्कार करण्यात आला. त्या वेळी केलेल्या छोटेखानी भाषणात उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, ‘आमच्या रेषा, बोलतात भाषा’ या वाक्यामध्ये अजून काही शब्द जोडून मी असे म्हणेन की ‘आमच्या रेषा, बोलतात भाषा व दाखवितात दिशा..’ साहित्य संमेलन हा मातृभाषेचा सोहळा आहे. म्हणजे एकप्रकारे आपल्या आईविषयीच आदर व्यक्त करण्याचा हा समारंभ आहे. आमचे राजकीय विचार कितीही वेगळे असले तरी मतभेद बाजूला ठेवून साहित्य संमेलनासारख्या सोहळ्यांमध्ये केवळ मराठीच्याच कल्याणाचा विचार करू. मराठी भाषा ही लेचीपेची अजिबात नाही. त्याचबरोबर इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून शिक्षण घेणे म्हणजे मराठी भाषेला विसरणे, असा होत नाही, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

Trending