आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रत्नागिरीत दुचाकी अपघातात कोल्हापुरातील नवविवाहितेचा मृत्यू

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रत्नागिरी- तालुक्यातील ओरी येथे मोटारसायकल घसरुन झालेल्या अपघातात कोल्हापुरातील नवविवाहितेचा मृत्यू झाला. गौतमी पृथ्वीराज मेहत्रे (वय-22, संभाजीनगर, कोल्हापूर) असे नवविवाहितेचे नाव आहे.

कोल्हापूर महापालिकेतील कर्मचारी पृथ्वीराज मेहत्रे हे आपली पत्नी गौतमी हिच्यासोबत गणपतीपुळेकडे देवदर्शनासाठी निघाले होते. ओरीजवळ पृथ्वीराज यांचा वाहनावरील ताबा सुटल्याने अपघात झाला. त्यात गौतमी आणि पृथ्वीराज गंभीर जखमी झाले. जाकादेवी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्‍यात आले. तेथून त्यांना रत्नागिरीतील एका खासगी रुग्नालयात हलविण्यात आले. तेथे गौतमीची प्रकृती आणखीच खालावली. तिला जिल्हा रुग्णालयात हलविले. परंतु उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला. पृथ्वीराज यांच्यावर उपचार सुरु आहेत. अपघाताची नोंद ग्रामीण पोलिसांत करण्यात आली आहे.