पशुसंवर्धनात सिंधूदुर्ग जिल्हा / पशुसंवर्धनात सिंधूदुर्ग जिल्हा बोगस, अधिकाऱ्यांच्या कामगिरीवर मंत्री महादेव जानकर संतप्त

May 19,2017 06:31:00 PM IST
सिंधुदुर्ग - जिल्ह्यात एकही पशुवैद्यकीय दवाखान्याला आय.एस.ओ प्रमाणपत्र मिळाले नाही. शासकीय योजना सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहचत नाहीत. जिल्ह्यात पशुसंवर्धनचे काम समाधानकारक नसून याबाबत महाराष्ट्रात सिंधुदुर्ग जिल्हा बोगस आहे. अशी नाराजी राज्याचे पशु, दुग्ध व मत्स्य व्यवसाय विकास मंत्री महादेव जानकर यांनी व्यक्त केली.

8 दिवसांत सुधारणा करा
वैभववाडी दौऱ्यावर आले असता त्यांनी येथील पशुवैद्यकीय दवाखान्याला भेट देऊन कार्याचा आढावा घेतला. यावेळी बोलताना त्यांनी कामगिरीवर नाराजी व्यक्त केली. वैभववाडी येथील पशुवैद्यकीय कामकाजाचा त्यांनी आढावा घेतला. यामध्ये एकाही दवाखान्यानाला आय.एस.ओ. मानांकन प्रमाणपत्र मिळाले नाही. पशु विमा, कृत्रिम रेतन, शासकीय योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहचवणे या सर्वच बाबतीत आपण सपशेल अपयशी ठरला आहात. आपण शासनाचा जो पगार घेतो. त्या पगारा एवढे तरी काम करा. येत्या आठ दिवसांत यामध्ये सुधारणा करा. अन्यथा गडचिरोलीला बदली करून पाठवू असा सज्जड दम त्यांनी दिला.
X