आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विनापरवाना बॅनर लावल्यास गुन्हा दाखल होणार; हायकोर्टाच्या निर्देशानंतर पोलिसांच्या सूचना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विनापरवाना बॅनर लावल्यास तीन वर्षे कैद किंवा दोन हजार रुपये दंड अशी शिक्षा होऊ शकते. - Divya Marathi
विनापरवाना बॅनर लावल्यास तीन वर्षे कैद किंवा दोन हजार रुपये दंड अशी शिक्षा होऊ शकते.
वैभववाडी (सिंधूदुर्ग) - उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार विनापरवाना बॅनर लावणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. यामध्ये तीन वर्षे कैद किंवा दोन हजार रुपये दंड अशी शिक्षा होऊ शकते. यापुढे निर्णयाची काटेकोरपणे अमंलबजावणी केली जाणार आहे. वैभववाडी पोलीस निरीक्षक अमोल साळुंखे यांनी स्थानिक राजकीय पक्षांच्या पाधिकाऱ्यांची बैठक बोलावून ह्या सूचना दिल्या आहेत. 
 
राजकीय पक्ष, पोलिसांची बैठक
उच्च न्यायालयाच्या बॅनर विषयक निर्णयाची माहिती देण्यासाठी पोलीस निरीक्षक साळुंखे यांनी वैभववाडी पोलीस स्थानकात राजकीय पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी वैभववाडी नगराध्यक्ष संजय चव्हाण, कॉग्रेसचे भालचंद्र साठे, भाजप कार्यालय प्रमुख अनंत फोंडके, वैभववाडी तालुका बौद्ध सेवा संघाचे सरचिटणीस रविंद्र पवार, रुपेश कांबळे, शिवाजी राणे, दिपक गजोबार, मुख्याधिकारी श्री कंकाळ इत्यादी उपस्थित होते.
 
बॅनरसाठी परवानगी काढणे बंधनकारक
यापुढे बॅनर लावण्यापूर्वी नगरपंचायतची रितसर परवानगी घ्यावी लागेल. विना परवाना बॅनर लावल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल केले जाणार आहेत. तसेच दोषी आढळल्यास तीन वर्षे कैद किंवा २ हजार रुपये दंड लावला जाईल. बॅनर लावणाऱ्याचे नाव, फोटो नसेल तर संबंधित बॅनर प्रिंट करणाऱ्या प्रिंटर्सवर सुद्धा कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे, प्रिंटिंग करून देणाऱ्यांना सुद्धा याबाबतच्या नोंदी ठेवाव्या लागणार आहेत.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...