ठाणे - एका सतरावर्षीय मुलीवर वीस वर्षांच्या तरुणाने बलात्कार केल्याची घटना ठाण्यात गुरुवारी उघडकीस आली. याप्रकरणी पीडित मुलीने तक्रार दिल्यानंतर अनिल अवसरमल याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, घटनेनंतर तो फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. पीडित मुलगी आणि अनिलची पूर्वीपासून ओळख आहे. तीन दिवसांपूर्वी अनिलने कल्याण रेल्वेस्थानकातील टॉयलेटमध्ये आपल्यावर अत्याचार केले. त्यानंतरही अनेकदा घरी येऊन अत्याचार केल्याचे मुलीने तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, मुलीला बालसुधारगृहात ठेवण्यात आले आहे.