ठाण्यात 19 वर्षीय / ठाण्यात 19 वर्षीय विवाहितेची विवस्त्र करून धिंड

वृत्तसंस्था

Oct 14,2013 05:17:00 AM IST

ठाणे - ठाण्यातील शहापूर तालुक्यातील एका 19 वर्षीय विवाहित तरुणीची सासरच्या मंडळीनी विवस्त्र करून धिंड काढल्याची घटना रविवारी घडली. एवढय़ावरच न थांबता तिचे मुंडणही करण्यात आले.

पीडित तरुणीने योगेश पाटील याच्यासोबत मे महिन्यांत विवाह केला होता. लग्नानंतर योगेश हा सासरवाडीत राहत होता. या विवाहामुळे योगेशचे कुटुंबीय नाराज होते. 30 ऑगस्ट रोजी योगेशच्या कुटुंबीयांनी दोघांनाही घरी आणले होते. तेव्हापासून या विवाहितेला त्रास दिला जात होता. रविवारी अत्याचाराची परिसीमाच गाठली.

X
COMMENT