आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठाण्‍यात इमारत कोसळली, मृतांचा आकडा 10 वर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ठाणे- अनधिकृतपणे बांधण्‍यात आलेली 'लकी' कंपाऊंडमधील इमारत कोसळण्‍याची घटनेनंतर आज मुंब्र्यात रेल्‍वे स्‍थानकाजवळ आणखी एक इमारत कोसळली आहे. या घटनेतील मृतांचा आकडा 10 वर गेला आहे. त्‍यात एका दोन महिन्‍यांची चिमुकली आणि 7 वर्षांचा एका चिमुकल्‍याचा समावेश आहे. तर 7-8 जण इमारतीत अडकल्‍याची भीती आहे.

'स्‍मृति' नावाची ही इमारत सुमारे 35 वर्षे जुनी आहे. धोकादायक इमारत म्‍हणून ठाणे महापालिकेने या इमारतीला नोटीस दिली होती. त्‍यानंतर रहिवाशांनी एका बिल्‍डरकडून इमारतीच्‍या दुरुस्‍तीचे काम सुरु केले होते. परंतु काम पूर्ण होण्‍यापूर्वीच इमारत कोसाळली.

या इमारतीमध्‍ये सुमारे 50 जण राहत होते. तळमजल्‍यावर गोदाम होते. पहाटे तीनच्‍या सुमारास इमारत कोसळली. बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे.

दोन महिन्‍यांपूर्वीच एप्रिलमध्‍ये शीळ फाट्याजवळ एक बेकायदेशीर इमारत कोसळली होती. त्‍यात 70 जणांचा मृत्‍यू झाला होता. त्‍यानंतर आता ही घटना घडली आहे.