आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Digital Flex Against Kalyan People Innovative Protest

दादा, भाईंच्या बॅनरबाजीला कंटाळले नागरिक, कुत्र्याच्या बर्थडेचा बॅनर लावून व्यक्त केला राग

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कल्याण- राज्यातील अनेक शहरात आजकाल युवा नेते, दादा, भाई, यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी  किंवा सण उत्सवा यात्रेनिमित्त मोठमोठे डिजीटल फलक उभारले जातात. या निमित्‍ताने शहरात बॅनर लावण्याची जणू स्‍पर्धाच सुरू होते. मग अशा या पोस्‍टरबाजीमुळे शहराचे विद्रुपीकरण होते. या पोस्‍टरबाजीला आणि बॅनरला कंटाळलेल्‍या शहरातील नागरिकांनी आज अनोखे पोस्‍टर उभारून बॅनरबाजांना जरा हटकेच संदेश दिला.

 

कल्याणच्या पूर्वेकडील नेतवली नाका परिसरात चक्क एका मॅक्सभाई नावाच्या कुत्र्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे बॅनर लावले. या बॅनरची आज मंगळवारी दिवसभर चर्चा सोशल मीडियात ही चांगलीच  रंगली होती. या मॅक्सभाईला जेष्ठ उद्योगपती टायसन भाई, युवा नेता डेंजर भाई, उद्योगपती प्रिन्सभाई, समाजसेवक मेरूभाई आदींचे शुभेच्छा देणारे फलक लावण्यात आले आहेत.

 

या फलकाच्या माध्यमातून नेते आणि भाई, दादा लोकांची चांगलीच खिल्ली उडवली असून हे बॅनर कल्याणमध्ये चर्चेचा विषय ठरले आहेत. त्रस्त झालेल्या कल्याणकरांनी कुत्र्याच्या वाढदिवसाचे बॅनर उभारून शहर विद्रुप करणाऱ्यांवर असा अनोख्या पद्धतीने राग व्यक्त केला. या बॅनरच्या माध्यमातून दादा, भाई, काकांना चांगला झोंबणारा संदेश मिळाला आहे.