Home | Maharashtra | Kokan | Thane | Women death due to overdose injection

प्रियकराशी शरीरसंबंधासाठी घेतले सेक्स पाॅवरचे इंजेक्शन, ओव्हरडोसमुळे प्रेयसीचा मृत्यू

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 10, 2018, 06:54 PM IST

पॉवर वाढवणारे इंजेक्शन घेतले होते मात्र अचानक तिची प्रकृती बिघडली. त्यावेळी तिच्यासोबत असलेला प्रियकर तिला त्याच अवस्थेत

  • Women death due to overdose injection

    ठाणे -प्रियकरासोबत शय्यासोबत करण्यासाठी घेतलेल्या सेक्स पॉवरच्या इंजेक्शनमुळे त्याच्या प्रेयसीचा मृत्यू झाल्याची घटना भिवंडीतील लॉजमध्ये घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मृत 29 वर्षीय महिला ही मुंब्रा परिसरातील अमृतनगर येथे राहणारी आहे. तिला दोन मुलेही आहेत. महिला 8 एप्रिल आपल्या प्रियकरासोबत अशोका लॉज येथे आली होती.


    प्रियकरासोबत ती रुममध्ये गेली. तिने सेक्स पॉवर वाढवणारे इंजेक्शन घेतले होते मात्र अचानक तिची प्रकृती बिघडली. त्यावेळी तिच्यासोबत असलेला प्रियकर तिला त्याच अवस्थेत सोडून निघून गेला. बराच वेळ झाला तरी महिलेसोबत आलेला तिचा प्रियकर परत आला नाही. त्यामुळे लॉजमधील कर्मचाऱ्यांनी रुमचा दरवाजा उघडला असता महिला बेशुद्ध अवस्थेत पडल्याचे दिसून आले. या कर्मचाऱ्यांनी तिला इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी तिच्यावर प्राथमिक उपचार करून तिला शुद्धीवर आणले. त्यावेळी तिने उपचार करणाऱ्या डॉक्टरांना तिचे नाव आणि राहत्या घराचा पत्ता सांगितला. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरु केला आहे.

Trending