आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकल्याण- शहागड भागात लोकल ट्रेनमधून एक युवक नाल्यात पडला पण तो बुडत असताना बघ्यांनी त्याला वाचवण्याएेवजी त्याचे व्हिडिओ शूट करण्यातच धन्यता मानली. यामुळे पुन्हा एकदा लोकांच्या असंवेदनशीलतेचा प्रत्यय आला. प्रकार सोमवारी सकाळी 11.30 वाजता घडला.
कल्याणच्या शहाड भागात एका नाल्याशेजारी स्थानिकांची अचानक गर्दी झाली. काय झालं हे पाहण्यासाठी अनेक जण आपापल्या गाड्या थांबवून नाल्याशेजारी धावले. यावेळी नाल्यात एक युवक बुडत असल्याचं लोकांना दिसलं. पण त्याला वाचवण्यासाठी कुणीही पुढे गेले नाही उलट सगळेच तो बुडतोय याचा व्हिडिओ आपापल्या मोबाईल्समध्ये रेकाॅर्ड करत होते. बघ्यातीलच एक तरुण नाल्यात उतरला, पण तोवर खूप उशीर झाला होता. या तरुणाचा सर्वांदेखत बुडून मृत्यू झाल्या होता.
माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या धक्कादायक घटनेचा व्हिडीओ पुढे आला, लोकांमध्ये पसरलेल्या असंवेदनशीलतेनं किती कळस गाठला आहे हे देखील समोर आले. या प्रकाराबाबत नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. लोकलमधून पडलेल्या या युवकाचं वय वीस वर्षांचं असल्याचे कळते न तो क्लास किंवा कॉलेजहून परतत असावा, अशी शक्यता वर्तवली जात आहे. शिवाय तो लोकलमधून नाल्यात पडला, त्यावेळी त्याच्यासोबत आणखी एक तरुणही होता, मात्र तो किरकोळ जखमी झाल्यानं उठून पळून गेल्याचं बोलले जात आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.