आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनुदान कमी, अादिवासी विकासमंत्र्यांचीही कबुली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पालघर - मंत्रालयापासून फक्त १०७ किलोमीटर अंतरावरच्या विक्रमगड तालुक्यातील दादडे गावातील ही अरविंद स्मृती संस्थेची अनुदानित आश्रमशाळा. जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी १९९१ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ अरविंद पेंडसे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ तीन अाश्रमशाळा सुरू केल्या. दाेन वाड्यांमध्ये अाणि एक विक्रमगडमध्ये. विक्रमगड तालुक्यातील दादरे गावातील या अाश्रमशाळेत तब्बल १३५० विद्यार्थी पहिली ते बारावीपर्यंतचे शिक्षण घेत अाहेत.
‘दिव्य मराठी’चे प्रतिनिधी दादडे गावात पोहोचले तेव्हा सावरांच्या या आश्रमशाळेचे विद्यार्थी शेजारच्या ओढ्यावर जेवणाची भांडी धुताना दिसले. इतकेच नाही, तर ६८ विद्यार्थ्यांमागे एक स्नानगृह असल्याने या विद्यार्थ्यांना अंघोळीसाठीही याच ओढ्यावर यावे लागते. त्याची साक्ष देणारी ही छायाचित्रे. कोल्हापुरी बंधाऱ्यावर कपड्यांच्या पिशव्या ठेवून कुडकुडत अंघोळ उरकणारे हे आश्रमशाळेतले चिमुकले विद्यार्थी. ‘दिव्य मराठी’च्या प्रतिनिधीस या ओढ्या शेजारच्या शेतात काही शेकोटीच्या खुणा दिसल्या. त्याबद्दल मुलांकडे चौकशी केली असता, ते म्हणाले, ‘ओढ्यातलं पाणी पहाटे खूप थंड असते म्हणून अंघोळी झाल्यावर आम्ही इथेच शेकोट्या पेटवू शेकतो.’
३० रुपयांत दोन वेळचा नाश्ता आणि दोन वेळचे जेवण हे पोषक आहाराचे अनुदान खूपच कमी आहे. वर्षभरातील आकस्मिक अनुदानातही आम्ही विद्यार्थ्यांची सकाळच्या दंतमंजनापासून रात्रीच्या अंथरुणापर्यंतची व्यवस्था करू शकत नाही. हे अनुदान वाढवून देण्यासाठी सरकार सकारात्मक आहे. हे अनुदान १६०० ते १८०० करावे, अशी संस्थांची मागणी आहे. हा फक्त आदिवासी विकास खात्याचा विषय नाही. समाजकल्याण आणि महिला व बालकल्याणतर्फे सुरू असलेल्या वसतिगृहांसाठीही अनुदानवाढीची मागणी आहे. त्यासाठी राज्याचे मुख्य सचिव आणि आदिवासी विकास, समाजकल्याण विभाग, महिला व बालविकास या खात्यांच्या सचिवांची समिती तयार करण्यात आली आहे. आमच्या आश्रमशाळेतली मुले कधी कधी गेली असतील ओढ्यावर, कदाचित त्यांची सुटी असेल, आमच्याकडे व्यवस्था आहे, पण अनुदानाआभावी ती कमी पडते कधी कधी.
- विष्णू सावरा, आदिवासी विकासमंत्री
बातम्या आणखी आहेत...