आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबई-गोवा महामार्गावर अपघात, ट्रकच्या धडकेत सिलिंडरचे स्फोट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रायगड - सिलिंडर वाहून नेणाऱ्या ट्रकला झालेल्या अपघातात स्फोट होऊन दोन जण जखमी झाले आहेत. मुंबई–गोवा महामार्गावरील पेण-हमरापूर फाट्यावर रविवारी पाहाटे सहाच्या दरम्यान दोन ट्रक एकमेकांना धडकून अपघात झाला. यातील एक ट्रक एलपीजी सिलिंडरने भरलेला होता. दोन्ही ट्रकची टक्कर एवढी भीषण होती की त्यामुळे सिलिंडरचा स्फोट होऊन घटनास्थळी आगीचे लोळ उठत होते. सकाळी दहा वाजता दरम्यान आग आटोक्यात आणण्यात यश आले. मात्र अजूनही मार्ग वाहतूकीसाठी खुला करण्यात आलेला नाही.

अपघात झाल्यानंतर सिलिंडरचे स्फोट होऊ लागले. तसेच घटनास्थळापासून शंभर ते दिडशे मीटर पर्यंत सिलिंडर उडाले. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. पेण-हमरापूर फाट्यावरील या अपघातानंतर वाहनांच्या सात ते आठ किलोमीटर पर्यंत रांगा लागल्या. दरम्यान, मुंबईच्या दिशेला येणाऱ्या आणि गोव्याकडे जाणाऱ्या वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. मुंबईकडे येणारी वाहतूक पेण-खोपोली मार्गे वळवण्यात आली आहे, तर गोव्याकडे जाणारी वाहतूक पळस्पे मार्गे खोपोली ते पाली वाकण मार्गे महाड गोवा मार्गावर वळवण्यात आली आहे.