रायगड पोलिसांत Love, / रायगड पोलिसांत Love, Sex आणि धोका, सहकाऱ्यालाच बॉम्ब लावून उडवले

निकेश पाटील निकेश पाटील
Oct 30,2015 05:07:00 PM IST
रायगड - प्रेमात आणि युद्धात सगळे काही क्षम्‍य आहे, असे म्‍हटले जाते. एवढेच नाही तर 'इश्क जब हद से गुजर जाए तो जुनून बन जाता है,' हे हिंदी गीतही प्रसिद्ध आहे. त्‍यातून प्रेमात बुडालेली व्‍यक्‍ती इतरांचा जीवही घेऊ शकते. असाच प्रकार रायडग जिल्‍ह्यात घडला. एका मजनू पोलिस कर्मचाऱ्याने त्रिकोणी प्रेमातून दुसऱ्या आपल्‍याच सहकाऱ्याच्या दुचाकीमध्‍ये बॉम्‍ब लावून त्‍याचा शांत डोक्‍याने खून केला. ही घटना रायगड जिल्हा पोलिस मुख्यालयाच्या आवारात बुधवारी घडली. निकेश पाटील (28) असे मृत पोलिस कर्मचाऱ्याचे नाव तर प्रल्‍हाद पाटील (45) असे आरोपीचे नाव आहे.
दुचाकी सुरू करताना झाला स्‍फोट
निकेश पाटील हे श्रीवर्धन पोलिस ठाण्यात कार्यरत होते. मात्र, प्रशिक्षणासाठी अलिबाग येथील पोलिस मुख्यालयात आले होते. बुधवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास पोलिस मुख्यालयाच्या आवारात उभी असलेली मोटारसायकल निकेश सुरू करताना स्फोट झाला. या स्फोटात निकेश पाटील हा गंभीररीत्या जखमी झाले. उपचारादरम्‍यान गुरुवारी मुंबईमध्‍ये त्‍यांचे निधन झाले.

पुढे वाचा, महिला पोलिस कर्मचाऱ्यांवर प्रल्‍हाद कसा झाला होता लट्टू
प्रेमाच्या त्रिकोणातून झाली हत्या एका महिला महिला पोलिस शिपायासोबत निकेश आणि प्रल्हाद यांचे प्रेमप्रकरण होते. दरम्यान, त्या यामुळे प्रल्हाद आणि त्या महिलेचे खटके उडायला लागले. पण, निकेश हे केवळ आपले चांगले मित्र आहेत, असेच ती त्याला सांगत होती. मात्र, प्रल्हाद ऐकायला तयार नव्हाता. त्यातूनच त्याने निकेश यांच्या दुचाकीला बॉम्ब लावून उडवून दिले. पुढे वाचा, कसे उघडकीस आले प्रकरण ?कसे उघडकीस आले प्रकरण ? या घटनेमुळे संपूर्ण रायगड जिल्हा हादरून गेला. ज्यांच्यावर नागरिकांच्या रक्षणाची जबाबदारी आहे त्याच पोलिस मुख्यालयात ही घडना घडल्याने पोलिसही कामाला लागले. दरम्यान, प्रल्हाद याच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. त्यातून त्याची चौकशी केली. त्यात आणखी धक्कादायक माहिती मिळाली. प्रेमप्रकरणातून पाटील यांना ठार मारण्यासाठी एका पोलिस कर्मचाऱ्यानेच त्यांच्या दुचाकीला बॉम्ब लावल्याचे उघड झाले. पुढे वाचा, कसा तयार केला बॉम्ब ?असा तयार केला बॉम्ब मजनू प्रल्हाद याच्या मनात निकेश यांच्याबद्दल प्रचंड राग होता. आपल्या प्रेमाच्या मार्गात निकेश हे अडथळा ठरत असल्याने त्याने त्यांचा काटा काढण्याचे ठरवले. त्यासाठी प्रल्हाद याने जिलेटीन आणि डेटोनेटर आणून निकेश यांच्या गाडीला फीट केले. निकेश यांनी बाइक सुरू करताच स्फोट झाला. यात निकेश हे ठार झाले. पुढे वाचा, शस्त्रसाठ्या जवळच झाला स्फोटशस्त्रसाठ्या जवळच झाला स्फोट ज्या ठिकाणी स्फोट झाला त्या जागेपासून अवघ्या 50 मीटर अंतरावर पोलिसांचा शस्त्रसाठा होता. स्फोट झाल्यानंतर एकच गोंधळ उडाला. तत्काळ श्वान पथक तसेच मेटल डिटेक्टरच्या साहाय्याने तपासणी करण्यात आली. सुरुवातीला हा दहशतवादी हल्ला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात होता. पुढे वाचा, मजनू पोलिस कर्मचारी अटकमजनू पोलिस कर्मचारी अटक या घटनेतील आरोपी पोलिस शिपाई प्रल्हाद पाटील याला अटक झाली असून, त्याला निलंबित करण्यात आले.
X
निकेश पाटीलनिकेश पाटील