आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अलिबागेत फटाक्याच्या फॅक्टरीला भीषण आग; सहा कामगारांचा होरपळून मृत्यू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रायगड- अलिबागमधील भायमळ्यातील फटाक्याच्या फॅक्टरीत आज (गुरुवारी) भीषण स्फोट झाला. त्यानंतर संपूर्ण फॅक्टरीत आग पसरली. आगीत सहा जणांचा होरपळून मृत्यू झाला असून 20 जण गंभीर जखमी झाल्याचे समजते.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी तीन वाजेच्या सुमार फटाक्याच्या कारखान्यात स्फोट झाला. त्यानंतर काही क्षणातच आग सर्वत्र पसरली. अग्नीशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल पोहोचल्या असून आग विझवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे.