आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठाण्यात एटीएम कॅश हँडलिंग कंपनीवर पाच कोटींचा दरोडा, सीसीटीव्ही सेटअपसह पळवला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तपास करताना पोलिस. - Divya Marathi
तपास करताना पोलिस.
ठाणे - ठाण्यात सात दरोडेखोरांच्या टोळीने बँकांच्या एटीएममध्ये पैसे पुरवणाऱ्या कंपनीवर मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास दरोडा टाकला. यात जवळपास पाच कोटी रुपयांची रक्कम लुटण्यात आली. तोंडावर रुमाल बांधलेल्या आणि माकडटोपी घातलेल्या दरोडेखोरांनी तीन सुरक्षा रक्षक कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवून एटीएम कॅश हँडलिंग कार्यालयात प्रवेश केला. कंपनी बँकांचे एटीएम, मॉल आणि ज्वेलर्ससाठी रोख रकमेचा पुरवठा करते. पळ काढण्यापूर्वी दरोडेखोरांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे कनेक्शनही कट केले. कर्मचाऱ्यांनुसार, दरोडेखोर मराठी-हिंदीतून बोलत होते. रोख रकमेसह त्यांनी मोबाइल हँडसेट आणि सीसीटीव्ही कॅमेरा रेकॉर्डरही चोरून नेले.
एवढी रक्‍कम कशी ?
> ‘चेकमेट प्रायव्हेट लिमिडेट’ कंपनी एटीएम मशीनमध्‍ये रोकड टाकण्‍याचे काम करते.
> स्टँडर्ड चार्टड, आयसीआयसीआय, यस बँक यांसारख्या नामवंत बँकांचे तिला कंत्राट मिळाले आहे.
> एटीएम मशीनमध्‍ये मंगळवारी ही रक्‍कम टाकली जाणार होती.
> परंतु, दरोडेखोरांनी बंदुकीच्‍या धकावर डल्‍ला मारला.
दरोडेखोरांनी सीसीटीव्ही सेटअपसह पळवला
दरोडेखोरानी तोंडावर काळे रुमाल बांधले असल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. दरम्‍यान, त्‍यांनी चाकू आणि बंदुकीचा धाक दाखवून रोकड लंपास केली. शिवाय सीसीटीव्ही सेटअपसह पोबारा केला.
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...