बापूंच्या सर्मथकांनी ठाण्यात / बापूंच्या सर्मथकांनी ठाण्यात रेल्वे अडवल्या

वृत्तसंस्था

Sep 02,2013 07:33:00 AM IST

ठाणे - अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप करत आसारामबापूंना अटक केल्याच्या निषेधार्थ त्यांच्या हजारो सर्मथकांनी रविवारी उल्हासनगर स्थानकात रेल्वे व लोकल गाड्या अडविल्या. या आंदोलनामुळे प्रवाशांचा मात्र चांगलाच खोळंबा झाला. रविवारी दुपारी बाराच्या सुमारास बापूंचे सर्मथक रेल्वेस्थानकावर जमा झाले होते. संतांवर खोटे आरोप लावून त्यांच्यावर सूडाने कारवाई करणार्‍या सरकारच्या निषेधाच्या घोषणा त्यांनी दिल्या. या आंदोलनामुळे कल्याण-कर्जत मार्गावरून जाणार्‍या गाड्या एक तास उशिराने धावत होत्या. पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले.

X
COMMENT