आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Attack On Police Inspector In Bhiwandi Thane District

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भिवंडीत मंगळसुत्र चोरांनी केला फौजदारावर चाकूने हल्ला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ठाणे - मंगळसूत्र चोरांच्या टोळीला पकडण्यासाठी गेलेल्या फौजदारावर गुन्हेगारांनी चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची घटना भिवंडी येथे रविवारी मध्यरात्री घडली. अभिजित भुजबळ असे जखमी झालेल्या फौजदाराचे नाव आहे. रविवारी रात्री मंगळसूत्र चोरांना पकडण्यासाठी कासारवाडी येथील 20 पोलिसांचे पथक भिवंडी येथे गेले होते. या वेळी पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले. मात्र, यातील दोघांनी भुजबळ यांच्यावर चाकूने वार केले. त्यांना जखमी अवस्थेत जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.