औरंगाबादचेही नामकरण संभाजीनगर / औरंगाबादचेही नामकरण संभाजीनगर करा - उध्‍दव ठाकरे

वृत्तसंस्था

Aug 30,2015 05:21:00 AM IST
ठाणे - दिल्लीतील औरंगजेब रस्त्याचे नाव बदलून ते डॉ. एपीजे अब्दुल कलाम रोड केल्याच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. याप्रमाणेच आता औरंगाबादचे नाव संभाजीनगर करा, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी एका कार्यक्रमात केली.

गेल्या अनेक वर्षांपासून औरंगाबाचे संभाजीनगर करावे, अशी मागणी आहे. आम्ही संभाजीनगर असे नामकरण करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, हा निर्णय केंद्रात अडकला. आत केंद्रात आणि राज्यात आमची सत्ता आहे. त्यामुळे औरंगाबादचे संभाजीनगर असे नामकरण करावे, असे उद्धव म्हणाले. गणेश मंडळांनी रस्त्यावर सण साजरे करू नयेत, या उच्च न्यायालयाच्या आदेशावर उद्धव ठाकरे म्हणाले, आम्हाला आमचे सण करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे हिंदू आपले सण उत्साहानेच साजरे करतील.
X
COMMENT