आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Babasaheb Village Will Be World Place Minister Badole

डॉ. बाबासाहेबांचे मूळ गाव अंबडवे जागतिक दर्जाचे स्थळ बनवू- राजकुमार बडोले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंबडवे, रत्नागिरी- घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव अंबडवे (ता. मंडणगड, रत्नागिरी) हे जागतिक दर्जाचे स्थळ होण्यासाठी राज्य सरकार सर्वोतपरी मदत करेल असे आश्वासन सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी सांसद आदर्श गाव योजनेतील अंबडवे येथील विकास कामाच्या उद्घाटन प्रसंगी दिले.
खासदार अमर साबळे यांनी सांसद आदर्श गाव योजनेतील दत्तक घेतलेल्या अंबडवे येथील अंगणवाडीच्या इमारतीचे भूमिपूजन सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते झाले. यावेळी खासदार अमर साबळे, केंद्रीय भटक्या जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष दादा इदाते, आमदार भाई गिरकर, भाजप जिल्हा अध्यक्ष बाळ माने, गटविकास अधिकारी धरण्गुत्तीकर, तहसीलदार कविता जाधव, सरपंच सुनिता फराटे आदी उपस्थित होते.
सांसद आदर्श ग्राम योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी यंत्रणेच्या माध्यमातून होत असलेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले व अंबडवे गावास आदर्श ग्राम करण्यासाठी राज्य सरकार शासनाच्या माध्यमातून सर्वोतपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. यावेळी त्यांनी योजनेचा आढावा घेत ग्रामस्थाबरोबर चर्चा केली तसेच तेथील समस्या जाणून घेतल्या. यावेळी खासदार साबळे यांनी सांसद आदर्श गाव योजनेतून अंबडवे येथे होणा-या प्रकल्पाची माहिती बडोले यांना दिली.