आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Best Tourist Places To Visit In Konkan, Maharashtra

महाराष्‍ट्रातील या समुद्र किनारपट्टीवर आहेत जगातील सुंदर बिच, पाहा फोटो

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिंधुदुर्ग - उन्‍हाळ्याच्‍या सुट्या कोकणात घालवायला कुणाला आवडणार नाही. गोव्यापेक्षाही एकाहून एक सुंदर बीच लाभलेल्‍या कोकणातील सिंधुदुर्ग जिल्‍ह्यात पर्यटकांची वर्दळ वाढणार आहे. महाराष्‍ट्रातील तापमानाच्‍या पा-याने 40 गाठली आहे. तरी हौशी पर्यटक उन्‍हाची फार पर्वा न करता दरवर्षी कोकणात फिरण्‍याचा आनंद घेत असतात. या संग्रहात जाणुन घेऊया कोकणातील पाच महत्‍त्वाची पर्यटनस्‍थळं.
कोकणात घ्‍या याचा आनंद...
- कोकण पर्यटनात आपल्‍या जगातील सुंदर बीचवर फिरण्‍याचा आनंद मिळतो.
- येथील एकाहून एक सुंदर समुद्रकिनारे डोळ्यात साठवावे वाटतात.
- डॉल्फिनचे दर्शनच्‍या दर्शनासह, विविध वॉटर स्पोर्टस् चा आनंदही येथे लुटला येईल.
- शिवाय हिरव्या माडाच्या बागा, सुंदर खाड्या, जलदुर्गही पर्यटकांसाठी पर्वणी आहेत.
- समुद्रतीरावरील देवालये पाहतानाही मन भारवून जाते.
- कोकणातील खास मालवणी जेवणाची चव चाखल्‍याशिवाय पर्यटक परतत नाहीत.
- सिंधुदुर्गमधील देवगड, मालवण आणि वेंगुर्ला हे तीन तालुके समुद्रकिनाऱ्यावर आहेत.
- या तीनही तालुक्यांची स्वतंत्र ओळख आहे. देवगड, वेंगुर्ला हापूस आंब्यांसाठी प्रसिद्ध आहेत.
तारकर्ली- तारकर्ली हे बीच समुद्री पर्यटनात जगात प्रसिद्ध आहे. या संपूर्ण किनाऱ्यावर वीज प्रकाशाची व्यवस्था आहे. पर्यटन विकास महामंडळाने येथे तंबू निवासाचीही व्यवस्था केली आहे. हाऊसबोट व स्पीड बोटीतून येथे समुद्रात सफर करता येते. हा परिसर मालवणपासून 6 किलोमीटर अंतरावर आहे.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, कोकणातील ही मनमोहक पर्यटनस्‍थळ....