आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भिवंडी पालिका कर्मचारी डिसेंबरच्या पगाराच्या प्रतिक्षेत

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ठाणे- महापौर चषकाच्या आयोजनासाठी उधळपट्टी करण्यासाठी भिवंडी पालिकेकडे लाखो रुपये आहे. परंतु कर्मचार्‍यांना डिसेंबरचा पगार देण्यासाठी नाही. असा संतप्त सवाल कर्मचार्‍यांनी प्रशासनाला विचारला आहे.
भिवंडी पालिकेचे मासिक उत्पन्न 16 कोटी 50 लाख रुपये असून त्यापैकी 14 कोटी रुपये जकातीपोटी मिळतात. साडेचार हजार कर्मचार्‍यांच्या पगाराकरता दरमहा सात कोटी रुपये लागतात. पालिकेचे विद्युत बील, पाटीपट्टी आदींसाठी नऊ कोटी रुपये उरतात. यातून कर्मचार्‍यांना पगार दिल्यानंतर दीड कोटी शिल्लक राहतात. यातून ठेकेदारांची बिले अदा केली जातात. असे असतानाही कर्मचार्‍यांना अद्याप पगार देण्यात आलेल्या नाही. कर्मचार्‍यांना उधार- उसनवारी घेऊन कुटुंबाचा गाडा पुढे ढकलावा लागत आहे. कर्मचार्‍यांच्या पगाराचे पैसे गेले कुठे असा सवालही उपस्थित होत आहे.