प्रकल्पग्रस्तांचा लढा सुरूच / प्रकल्पग्रस्तांचा लढा सुरूच राहील; राम नाईक यांच्या पुस्तकाचे प्रकाशन

May 12,2013 07:03:00 AM IST

ठाणे- तारापूर अणुऊर्जा प्रकल्पग्रस्तांचा लढा यापुढे सुरूच राहील, असा निर्धार भाजपचे ज्येष्ठ नेते राम नाईक यांनी व्यक्त केला. सरकारने पुनर्वसन कार्यक्रम राबवला नाही. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी त्याविरोधात न्यायालयीन लढाई सुरू आहे. नाईक यांचे चर्चगेट ते डहाणू लोकल रेल्वेवर आधारित पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले त्या वेळी ते बोलत होते.

आपल्या तीन कामांसाठी आंदोलन सुरूच राहील. यात मच्छीमारांना डिझेलमध्ये सबसिडी, शेतकर्‍यांच्या धर्तीवर मच्छीमारांना मदत तसेच तारापूर अणुऊर्जा प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसन कार्यक्रमाचा समावेश आहे. अणुऊर्जा प्रकल्प मुदतीपूर्वी कार्यान्वित झाल्याने 400 कोटी रुपयांची बचत झाली. सरकारने हा पैसा पुनर्वसन कार्यक्रमात खर्च करणे आवश्यक होते, मात्र सरकारने केवळ 86 कोटी रुपये खर्च केल्याचा दावा त्यांनी केला.

X