निवडणुकीचा बिगुल: मतदानाच्या / निवडणुकीचा बिगुल: मतदानाच्या सुदर्शन चक्राने राक्षसरूपी सरकार ठार करा

वृत्तसंस्था

May 12,2013 07:03:00 AM IST

ठाणे- भ्रष्टाचाराच्या गर्तेत अडकलेले राज्य व केंद्रातील कॉँग्रेसप्रणीत सरकार घालवण्याची वेळ आली आहे. भगवान श्रीकृष्णाने सुदर्शन चक्राने अनेक राक्षसांचा वध केला, त्याप्रमाणे मतदारांनी कॉँग्रेस आघाडी सरकारला ठार करावे, असे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी केले. ते ठाण्यात एका कार्यक्रमात बोलत होते.
सरकार आणि सत्ताधार्‍यांमुळे संपूर्ण देश विविध समस्यांनी ग्रासला आहे. सरकारमुळे भ्रष्टाचार वाढला असून कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण झाले आहेत. मतदारांनी सत्तेच्या मस्तवाल हत्तीला रोखावे. राष्ट्रवादीवर टीका करताना ते म्हणाले, हा पक्ष असहिष्णू, असंस्कृत आणि भ्रष्टाचारात डुबलेला आहे. भाजप-शिवसेना आणि रिपाइंची महायुती राहिल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

कार्यपद्धतीचा अभ्यास
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कर्नाटकमध्ये भाजपच्या पराभवाबद्दल व्यक्त केलेल्या मतप्रदर्शानाबाबत त्यांनी भाजपपेक्षा जेडीएस व कॉँग्रेसकडून मराठी भाषिकांवर जास्त अन्याय होत असल्याचे सांगितले. आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देताना प्रत्येक मतदारसंघाचा व उमेदवाराच्या कार्यपद्धतीचा अभ्यास केला जाईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

X
COMMENT