रायगड जिल्ह्यातील बोम्बल्या / रायगड जिल्ह्यातील बोम्बल्या यात्रेला सुरवात; जुगार सर्रास सुरु.पोलीस गप्प...

दिव्य मराठी

Nov 18,2011 11:24:21 AM IST

रायगड - जिल्ह्यातील सर्वात मोठी आणि सलग पंधरा दिवस चालणाऱ्या बोम्बल्या विठोबा यात्रेला सुरवात झाली आहे. दरवर्षी प्रमाणे भरगच यात्रेत नाना प्रकारची दुकाने थाटली आहे.विशेष म्हणजे कोकणातील महत्व प्राप्त यात्रेत यंदाही करोडो रुपयांची उलाढाल अपेक्षित आहे.संत तुकारामाच्या पदसस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत यात्रा भरत असल्याने भाविक मोठ्या उत्साहाणे यात्रेत सहभागी होताना दिसत आहेत,तर दुसरीकडे रात्रीच्या वेळेत यात्रेत जुगार मोठ्या प्रमाणत चालत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
जगतगुरु संत तुकाराम महाराज घाटमाथ्या वरून मिरचीचा व्यवसाय करण्यासाठी कोकणात येत असत एकदा संत तुकाराम महाराज यात्रेत मिरची विकता-विकता आपल्या लाडक्या पांडुरंगाच्या भक्तीत तल्लीन झाले असताना यात्रेतील लोकांनी तुकाराम महाराज यांच्या मिरच्या चोरून पैसे न देता घेऊन गेले .या मुळे दुखी झालेल्या तुकाराम महाराज यांनी विठलाच्या नावाने बोंब मारली नंतर साक्ष्यात विठ्ठलाने याच ठिकाणी तुकारामांना दर्शन दिले, विठ्ठलाने तुकारामांना मिरची दिल्याचा इतिहास या साजगावच्या यात्रेला असल्याने तेव्हा पासून या यात्रेला बोम्बल्या विठोबा असे संबोधले जाते.
गेली अनेक शतका पासून या ठिकाणी यात्रा परंपरा अजूनही भव्य देवी स्वरुपात सुरु आहे.साजगावच्या यात्रेत बैल बाजार मोठ्या प्रमाणात भरला जातो.कोकणातील शेतकर्यांना चांगल्या जातीचे जनावरे व्यापारी उपलब्ध करून देत असतात .यंदा यात्रेला भव्य-दिव्य स्वरूप प्राप्त झाले आहे.रायगड मधूनच नव्हे तर पुणे ,कल्याण,मुंबई,महाड,आदी भागातून लोक यात्रेला भेटी देत असतात.कोकणातील मच्छिमारी कोळ्यांची सुकी मासळी चा बाजार मोठ्या प्रमाणत असते. लोक वर्षभराची सुकी मासळी याच यात्रेत खरेदी करतात.खाउची दुकाने यात्रेत असल्याने खवयेसाठी दिवाळी अवतरली आहे. यात्रेतील जिलेबी लोक आवडीने खातात.
यात्रेत काही वर्षापासून जुगार मोठ्या प्रमाणात खेळला जात आहे. यंदा सर्रास रात्रीच्या वेळेस लाल-काळा,चक्री,गुडगुडी या सारखे जुगारी खेळ पोलिसांच्या आशीर्वादाने सुरु आहेत.भक्तांचा मांदियाळीत जुगार खेळला जात असल्याने अनेकांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे.
काही दिवसापूर्वी याच पोलिसांनी गणपतीच्या जुगार अड्ड्या वर धाड टाकून खळबळ उडून दिल्याची घटना उघडकीस आल्यानंतर त्याच खोपोली पोलिसांच्या समोर जुगार खेळले जात असल्याचा धक्कादायक प्रकार यात्रेच्या निमित्ताने समोर आल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर संशय निर्माण झाला आहे. जुगाराच्या बाबतीत आम्ही पोलिसांना विचारण्याचा प्रयत्न केला असता पोलीस जुगारावर भाष्य करण्यास तयार नव्हते. जुगाराच्या अड्ड्याच्या मालकाकडून पोलीस हजारो रुपय हप्ता कमवत असल्याचे बोलले जात आहे.X
COMMENT