आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नारपोली भागात दुमजली इमारत कोसळली; तीन ठार, बचावकार्य सुरु

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ठाणे- भिवंडीतील नारपोली भागात दुमजली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला असून 35 जण जखमी झाले आहेत. बुधवारी रात्री साडेबारा ते दीडच्या सुमारास ही दुर्घटना घडली. बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे.
'अरिहंत कॉम्प्लेक्स' या औद्योगिक वसाहतीत ही दुमजली इमारत होती. यामध्ये रेडिमेड कपडे शिलाईचे काम सुरू होते. दुर्घटना घडली त्यावेळी इमारतीत 45 कामगार काम करत होते. यापैकी आतापर्यंत 20 जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे. परंतु ढिगार्‍याखाली आखणी काही जण दाबले गेले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जखमींना महापालिकेच्या इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.