आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: ठाण्यात इमारत कोसळली, 12 ठार, भट कुटुंबावर काळाचा घाला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ठाणे- ठाण्यातील बी केबिन परिसरातील तीन मजली इमारत कोसळून 12 जणांचा मृत्यू झाला तर सात जण गंभीर जखमी झाले. ढिगार्‍याखाली 17 जण अडकले असून मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. सोमवारी मध्यरात्री पावणे दोनच्या सुमारास ही दुर्घटना घडली. 'कृष्णा निवास' असे या इमारतीचे नाव आहे. 50 वर्षे जुन्या या इमारतीत एकूण पाच कुटुंबे राहत होती.

अग्निशमन दल आणि एनडीआरएफकडून बचावकार्य सुरु आहे. ढिगार्‍याखाली अजून 17 जण अडकले असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (मंगळवार) सकाळी घटनास्थळाची पाहणी केली.

मृतांची नावे…
-शुभराव पांडुरंग भट
-रामचंद्र पांडुरंग भट
-मीरा रामचंद्र भट
-रश्मी रामचंद्र भट
-अरूण दत्तात्रय सावंत
-भक्ती खोत सावंत
-अनया अजित खोत
– प्रिया अमृतलाल पटेल
– अमित सावंत
– मंदा अरविंद नेने
– रश्मी करन मनगे

भट कुटुंबावर काळाचा घाला
ठाण्यातील या दुर्घटनेतील काळजाला चटका लावणारी घटना समोर आली आहे, ती म्हणजे दुर्घटनेत भट कुटुंबियातील चार जणांचा मृत्यु झाला आहे. मीरा भट, रामचंद्र भट या पती-पत्नीसोबतच त्यांच्या दोन्ही मुलींचा (रश्मी आणि रचिता) या चौघांना मृत्यू झाला आहे. रामचंद्र भट यांचा केंटरिंगचा व्यवसाय होता.

भट यांची मोठी मुलगी रश्मीचा दोन महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. ती काही दिवसांपूर्वी माहेरी आली होती तर दुसर्‍या मुलीचे शिक्षण सुरु होते.

दरम्यान, महापालिकेने येथील रहिवाशांना इमारत धोकादायक असल्याची नोटीसही पाठवली होती. त्यानुसार काही कुटुंब इमारत सोडून इतर ठिकाणी राहण्यास गेले होते. मात्र, 5 कुटुंबे इमारतीतच राहत होती, अशी माहिती मिळाली आहे.

या आठवड्यात इमारत कोसळण्याची ही दुसरी घटना आहे. याआधी ठाकुर्ली येथे इमारत कोसळून नऊ जणांचा मृत्यू झाला होता.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, दुर्घटनेचे विदारक फोटो...