आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Building Collapse In Mumbra Near Railway Station Four Death

मुंब्रा रेल्वे स्टेशनजवळ चार मजली इमारत कोसळली; एक ठार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ठाणे- मुंब्रा रेल्वे स्टेशनजवळील 'दिवान बानू कॉम्प्लेक्स' ही चार मजली इमारत आज (शनिवारी) सकाळी साडे सात वाजता कोसळली. अनेक रहिवासी इमारतीच्या ढिगा-याखाली अडकल्याची भीतीही व्यक्त करण्यात येत आहे. एकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला असल्याचे कळते. अद्याप मृत व्यक्तीची ओळख पटलेली नाही.

दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या डागडुजीचे काम सुरु होते. इमारतीला तडेही गेले होते. अखेर इमारत कोसळलीच. पालिकेचे कर्मचारी आणि अग्निशामन दलाच्या कर्मचार्‍यांकडून ढिगारा उपासण्याचे काम सुरू आहे.